गेल्या २० वर्षात पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी गांधी परिवारातील कोणीही या निवडणुकीत सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची नावे आघाडीवर असताना, राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गेही आज आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी रंजक होणार आहे.

हेही वाचा – Congress President Election: काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची गळाभेट; थरुर म्हणाले, “ही लढाई तर…”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि शशी थरूर हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, आता मल्लिकार्जुन खर्गेही उमेदावारी अर्ज दाखल करणार असल्याने अध्यक्षपदासाठीची लढत ही तिरंगी होईल का? असे जेव्हा दिग्विजय सिंह यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहा, असं उत्तर दिलं.

हेही वाचा – अशोक गेहलोत रिंगणाबाहेर!; काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, दिग्विजय सिंह यांचे आज अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार –

काँग्रसेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मतदान करती