काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेचा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास सुरू आहे. या यात्रेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रादेखील सहभागी झाल्या आहेत. गांधी बहिण-भावांचा फोटो काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे. “जेव्हा आम्ही एकत्र चालू तेव्हा आमची पावलं आणखी मजबूत होतील”, असं कॅप्शन या पोस्टला हिंदीत देण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंहदेखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. खंडवाच्या बोरगावातून आज सकाळी ही यात्रा सुरू झाली आहे. खरगोनला जाण्यापूर्वी काँग्रेसजण स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासींचे नेते टंट्या भिल यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत.

Bharat Jodo: “सर्व लोकशाही मार्ग बंद झाले आहेत”, मध्य प्रदेशात राहुल गांधींचं विधान; आरएसएस, भाजपावर गंभीर आरोप

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
pappu yadav in purniya loksabha
बिहारमध्ये जागावाटपावरून इंडिया आघाडीला तडे? भरसभेत काँग्रेस नेता ओक्साबोक्शी रडला

आदिवासी क्षेत्रात प्रभाव निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना सत्ताधारी भाजपाने ‘जनजातीय गौरव’ यात्रेने प्रत्युत्तर दिलं आहे. टंट्या भिल यांच्या जन्मस्थळापासून बुधवारी या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि चार मंत्र्यांनी सहभाग घेतला होता.

Bharat Jodo Yatra: “राहुल गांधी सद्दाम हुसेनसारखे दिसत आहेत,” भाजपाने उडवली खिल्ली, काँग्रेस म्हणालं “निष्ठावंत कुत्र्यापेक्षा…”

दरम्यान, बुधवारी बुऱ्हानपूर येथील सभेत राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली आहे. “आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकलो होतो. तेथे आमचं सरकार होतं. मात्र, त्यांनी (भाजपा) २० ते २५ भ्रष्टाचारी आमदारांना कोट्यावधी रुपये देत खरेदी केले आणि सरकार स्थापन केलं”, असा आरोप गांधी यांनी केला आहे.

“सर्व लोकशाही मार्ग बंद झाल्याने आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. लोकसभा, निवडणुकीचा मार्ग, माध्यमं सर्व बंद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाने या सर्व संस्थांना वेठीस धरलं आहे. न्यायव्यवस्था, न्यायालयं दबावात आहे”, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.