पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील ४०३, पंजाबमधील ११७, मणिपूरमधील ६०, उत्तराखंडमधील ७० आणि गोव्यातील ४० विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीची कल पाहता काँग्रेस पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. पंजाबमधील सत्ता हातून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा फालूदा खात असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी राहुल गांधी फालूद्याचा आस्वाद घेताना दिसले. राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहे. यासाठी वायनाडमध्ये काँग्रेसचं कार्यालय उघडण्यात आलं आहे. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी फालूदा आस्वाद लुटला. त्याचबरोबर राहुल गांधी मलप्पुरममधील नवीन-उघडलेल्या इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळताना दिसले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पूर्ण भरलेल्या फालूद्याच्या ग्लाससोबत फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटो खाली “Many Flavours of Wayanad” असं कॅप्शन लिहिलं आहे.

त्यानंतर राहुल गांधी मलप्पुरममधील नवीन-उघडलेल्या इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळले. याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून सत्ता जाताना दिसत आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपनं जोरदार आघाडी घेतली आहे.