काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील तीन शहरांमध्ये राहुल गांधी संबोधित करत आहेत. न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे राहुल गांधी नागरिकांशी चर्चा करणार आहे. त्यापूर्वी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सहा दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सॅन फ्रॉन्सिस्को आणि वॉश्गिंटन डीसी येथे संबोधित केलं आहे. तेव्हा प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, नवीन संसद भवन या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

हेही वाचा : भारताची लोकशाही कोसळणे जगासाठी घातक -राहुल गांधी

रविवारी ( ४ जून ) राहुल गांधी न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे संबोधित करणार आहेत. त्याआधी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर व्हायरल केला जात आहे. तसेच, जेविट्स सेंटर येथील कार्यक्रम पार पाडण्यासाठी तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा, प्रवक्त्या अलका लांबा आणि अन्य काँग्रेस नेते न्यूयॉर्कला पोहचले आहेत.

हेही वाचा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने का भिरकावला माईक? व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर जाहिरातीसाठी किती खर्च?

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे. येथे एक दिवसाला जाहिरातीसाठी ५ हजार डॉलर ते ५० हजार डॉलरपर्यंत ( ४ लाख ते ४१ लाख रुपये ) भाडे आकारण्यात येते. व्हिडीओच्या वेळेनुसार भाडे आकारले जाते.