खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा चालू आहे. या यात्रेत काँग्रेस नेत्यांकडून सत्ताधारी भाजपाचे धोरण आणि कार्यशैलीवर वारंवार टीका करण्यात येत आहेत. खासदार राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने विचारला जातो. या प्रश्नाला राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘या ७० वर्षांत आम्ही भारताला कधीही सर्वाधिक बेरोजगारी दिली नाही. आजच्या घडीची विक्रमी भाववाढ आम्ही भारताला कधीच दिली नाही’, असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“दिल्लीएवढ्या जमिनीवर चीनचा…”, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

‘भाजपा सरकार शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी नाही. हे सरकार देशातील पाच ते सहा श्रीमंत भारतीयांसाठीचे सरकार आहे जे लोक भारतातील हव्या त्या व्यवसायात मक्तेदारी करू शकतात’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशातील महागाई आणि बेरोजगारीचा भाजपातील उद्योगपतींना फायदा होत असल्याचा आरोप याआधी गांधी यांनी वारंवार केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील युवकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील आघाडी सरकारमुळे भारताच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचे मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर काही तासातच ट्वीट करत राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. देशातील महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस भाजपा सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसने आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत.