scorecardresearch

CoronaVirus : राहुल गांधींचा इशारा खरा ठरला; मोदी सरकारला आधीच केलं होतं सावध

राहुल गांधी यांनी इतर देशात करोनाचा संसर्ग होत असतानाच तीन ट्विट करून सरकारला केलं होतं सावध

CoronaVirus : राहुल गांधींचा इशारा खरा ठरला; मोदी सरकारला आधीच केलं होतं सावध

करोनामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय केले जात असले, तरी संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याचे एकूण चित्र आहे. यासंर्दभात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फेब्रवारीमध्येच केंद्र सरकरला सावध केलं होतं. पण, सरकारनं त्यांचा सल्ला गांर्भीयानं न घेतल्याचं दिसलं. सध्या भारतात करोनानं हातपाय पसरले आहेत.

करोनानं जगातील देशांपाठोपाठ भारतातही शिरकाव केला आहे. देशातील करोना बाधितांची दररोज वाढत असून, देशातील तब्बल ७५ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले आहेत. केरळ, महाराष्ट्र, पंजाबबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही करोनानं पाय ठेवले असून, करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत चालला आहे.

चीननंतर इतर देशात करोनाचा प्रसार सुरू झाला. त्यावेळी काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात मोदी सरकारला सावध केलं होतं. करोनाचं संकट गंभीर असल्याचं त्यांनी मोदी सरकारला सांगितलं होतं. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करून केंद्र सरकारला सावध होण्याचा इशारा दिला होता.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

१२ फेब्रुवारीचं ट्विट

‘भारतातील लोकांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी करोना गंभीर धोका आहे. मला असं वाटत की, केंद्र सरकार हा धोका गांभीर्यानं घेतना दिसत नाही. वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असा इशारा राहुल गांधींनी दिला होता.

३ मार्चचं ट्विट

‘प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा त्या राष्ट्राच्या नेत्याची परीक्षा घेतली जाते. एक प्रामाणिक नेता भारत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करेल,’ असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं.

५ मार्च रोजी केलेलं ट्विट

‘देशाचे आरोग्यमंत्री सांगत आहेत की, करोना व्हायरसचं संकट पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात आहे. हे म्हणजे टायटॅनिकचा जहाजाच्या कॅप्टननं जहाजातील प्रवाशांना घाबरू नका असं सांगण्यासारखं आहे. जसं की जहाज बुडण्यासारखं नाही. या संकाटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं कृती योजनेची अमलबजावणी करण्याची वेळ आली आहे,’ असं राहुल गांधी सरकारला उद्देशून म्हणाले होते.

त्यानंतर भारतात करोनाचा संसर्ग वाढत गेला. दहा मार्च रोजी महाराष्ट्रात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ इतर राज्यांमध्येही करोनाचा संसर्ग वाढत गेला. महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. तर देशातील ७५ जिल्ह्यांचीही स्थिती अशीच आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या