scorecardresearch

आयुर्वेदातील ही वनस्पती करोना विषाणूची वाढ रोखण्यात ९८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरते; संशोधकांचा दावा

आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या रसाचा वापर हा ताप, डेंग्यु आणि इतर संप्रेरकांशीसंबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात असल्याने ही वनस्पती वापरासाठी सुरक्षित आहे

आयुर्वेदातील ही वनस्पती करोना विषाणूची वाढ रोखण्यात ९८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरते; संशोधकांचा दावा
आता केवळ रॅण्डमाइज क्लिनिकल ट्रायर्समध्ये हे किती परिणामकारक ठरतं याकडे संशोधकांचं लक्ष आहे.

भारतामधील केंद्र सरकाच्या अखत्यारित असणाऱ्या औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेच्या तीन प्रयोगशाळांमध्ये करोनासंदर्भातील एका संशोधनात आयुर्वेदात वापरण्यात येणारी एक वनस्पती महत्वाची भूमिका बजावू शकते अशी माहिती समोर आलीय. पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्क कोव्ही-२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो असं संशोधनामधून दिसून आलं असलं तर या संशोधनावर अद्याप काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> मुस्लीम समाजातील लोक करोनाची लस घेण्यास टाळाटाळ करतात; माजी मुख्यमंत्र्यांचं मत

मराठीमध्ये धाकटी पाडावळ, लहान पहाडवेल ओळखल्या जाणाऱ्या व्हेलव्हेटलीफच्या मुळांचा रस आयुर्वेदामध्ये ताप उतरवण्यासाठी खास करुन डेंग्युच्या तापावर परिणामकारक असतो. संशोधनामध्ये अशाप्रकारच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारांवरही या वनस्पतीच्या मुळांचा रस परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या मुळांचा रस  हा करोना विषाणूची संख्या वाढण्यापासून (रेप्लिकेट होण्यापासून) रोखतो. या रेप्लिकेशनवर मुळांचा रस ९८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत असल्याचं संशोधनामध्ये दिसून आलं आहे. मात्र या संशोधनाला अद्याप मान्यता मिळायची असून अंतीम टप्प्यातील काही प्रयोग सुरु असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या वनस्पतीमधील काही तत्वांमुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झालं तर यापासून बनवण्यात आलेल्या हायड्रोक्लोरिक तत्वांमुळे (नैसर्गिक तत्वांमध्ये पाणी आणि अल्कोहोल मिसळून तयार करण्यात येणारं द्रव्य) विषाणूचा संसर्ग थोपवण्यात ९८ टक्क्यांपर्यंत यश आलं.

नक्की वाचा >> हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर

या वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांपासून काढण्यात आलेला रस हा सार्क-कोव्ही-२ विषाणूवर किती परिणामकारक ठरतो याचीही चाचणी करता आली. या चाचणीमध्ये परेररीनला प्रतिबंध करण्याचं प्रमाण हे ८० टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं, असं या संशोधनाच्या प्रकाशनापूर्वीच्या बायोरेक्सीवर अपलोड केलेल्या अहवालामध्ये लिहिण्यात आलं आहे. परेररीनच्या माध्यमातून एका मानवी पेशीतून दुसऱ्या मानवी पेशीला संसर्ग होतो.

नक्की वाचा >> देशात लसीकरणानंतर ४८८ जणांचा मृत्यू; तर २६ हजार २०० जणांमध्ये दिसले गंभीर Side Effects

“आधी आम्ही कनेक्टीव्हीटी मॅपचा वापर केला. कनेक्टीव्ही मॅपच्या माध्यमातून औषधे कशापद्धतीने परिणाम करतात हे समजून घेता येते. या माध्यमातून या वनस्पतीमधील तत्व विषाणूवर कशापद्धतीने प्रभावी ठरतात हे समजून घेण्यात आलं. या अभ्यासामधून संसर्गजन्य आजारांवर काम करणाऱ्या औषधांप्रमाणेच हे प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. आम्ही त्यानंतर प्रयोगशाळेत चाचण्या केल्यावर कनेक्टीव्हीटी मॅपवरील निकाल या निकालाशी साम्य असणारा दिसून आला,” असं डॉ. मिताली मुकेर्जी यांनी एचटीशी बोलताना सांगितलं. डॉ. मिताली या सीएसआयआरच्या जिनोमिक्स अ‍ॅण्ड मॉलिक्युलर मेडिसिन डिपार्टमेंट विभागामध्ये कार्यकरत आहेत.

नक्की वाचा >> कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या रसाचा वापर हा ताप, डेंग्यु आणि इतर संप्रेरकांशीसंबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. “त्यामुळेच हे सुरक्षित असल्याचं निश्चित झालं आहे. आता केवळ रॅण्डमाइज क्लिनिकल ट्रायर्समध्ये हे किती परिणाम करतं आणि संसर्ग रोखून धरण्यासाठी किंवा संसर्गाचा कालावधी वाढवण्यात किती प्रभावी ठरतं हे दिसून येईल,” असंही डॉ. मिताली म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus plant extract used in ayurveda reducing covid viral replication says research scsg

ताज्या बातम्या