उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू होणार असून दुपापर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल.

बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे काँग्रेसने गेल्या वेळी झालेला गलथानपणा टाळण्याची दक्षता घेतली आहे. २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यशस्वी झाला होता. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती. या वेळी गोव्यातील सर्व उमेदवारांना काँग्रेसने हॉटेलमध्ये एकत्र केले असून निकालानंतर होणारा संभाव्य घोडेबाजार टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस
Kerala bjp campaign
केरळमध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न
kangana ranaut
कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

उत्तर प्रदेश वगळता चारही राज्यांमध्ये काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना ‘तैनात’ केले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांवर नजर ठेवणे, तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अन्य पक्षांशी सरकार बनवण्यासाठी चर्चा करणे या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निवडणूक प्रभारी पी. चिदम्बरम आणि कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत. महासचिव मुकुल वासनिक, छत्तीसगढचे नेते टी. एस. सिंह देव आणि व्हिन्सेंट पाला यांना मणिपूरला पाठवण्यात आले आहे. महासचिव अजय माकन व प्रवक्ता पवन खेरा यांच्याकडे पंजाब तर, खासदार दीपेंदर हुड्डा यांच्याकडे उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी जयपूर येथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली होती. गरज भासल्यास चारही राज्यांतील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये आणले जाऊ शकते.

भाजपनेही विजयाची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी सुरू केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भाजपने ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची सोपवली असून तेही गोव्यात दाखल होत आहेत. उत्तराखंडमध्येही भाजपचे सरकार असून सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कैलास विजयवर्गीय यांना देहरादूनला पाठवले आहे.

बहुमतासाठी..

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. ७० जागांच्या उत्तराखंडमध्ये बहुमतासाठी ३६ जागा जिंकाव्या लागतील. पंजाबमध्ये ११७ जागा असून बहुमतासाठी ५९ सदस्य विजयी व्हावे लागतील. गोवा विधानसभेत ४० जागा असून बहुमतासाठी

२१ जागा जिंकाव्या लागतील. मणिपूरमध्ये ६० जागा असून बहुमतासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ गरजेचे आहे.

अंदाजानुसार

बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल.