scorecardresearch

Covid-19 New Variant : भारतात पाय पसरतोय करोनाचा XBB1.16 व्हेरिएंट, डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा

XBB.1.16 हा करोनाचा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. तसंच या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहेत

corona patients
नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना (Covid 19) रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. तसंच सक्रिय रूग्णांची संख्याही वाढते आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये जे करोना रूग्ण वाढू लागले आहेत त्याचं कारण XBB1.16 हा नवा व्हेरिएंट आहे. XBB1.16 हा व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरिएंटचं रिकॉम्बिनेशन असलेल्या XBB सारखाच आहे. हा व्हेरिएंट भारतात पाय पसरू लागला आहे. सध्या भारतात XBBB1.16 चे ७६ रूग्ण आहेत.

काय आहे XBB1.16 व्हेरिएंट?

WHO च्या व्हॅक्सिन सेफ्टी नेटचे सदस्य डॉ. विपीन वशिष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार XBB1.16 हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा व्हेरिएंट XBB चं रिकॉम्बिनेशन आहे. XBB1.16 या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे कारण तो वेगाने पसरतो आणि तो प्रतिकार शक्तीवरही काही प्रमाणात आघात करू शकतो असंही डॉ. वशिष्ठ यांनी म्हटलं आहे. एका अहवालानुसार कोव्हिडच्या या नव्या व्हेरिएंटमुळे करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

XBB.1.16 हा व्हेरिएंट किती घातक?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार XBB.1.16 हा व्हेरिएंट आत्तापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. जर याबाबत योग्य पद्धतीने करोनाचे सगळे नियम पाळून काळजी घेतली गेली नाही तर हा खूप वेगाने पसरू शकतो. हा व्हेरिएंट १२ देशांमध्ये आढळला आहे. १२ देशांपैकी भारतात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण आहेत.

कोणत्या देशांमध्ये पसरला आहे XBB.1.16 व्हेरिएंट?

XBB.1.16 हा व्हेरिएंट आत्तापर्यंत १२ देशांमध्ये आढळला आहे. भारत, अमेरिका, ब्रुनेई, सिंगापूर, चीन आणि युके या यादीत समाविष्ट आहेत. मात्र या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण हे भारतात आढळले आहेत. आज तकने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

डॉ. विपिन वशिष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार XBB.1.16 हा करोना व्हेरिएंट XBB.1.5 या व्हेरिएंटच्या तुलनेत १४० टक्के वेगाने जास्त प्रमाणात पसरतो. या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण हे भारतात आढळल्याने काळजी घेण्याचं आवाहन सगळ्याच तज्ज्ञ डॉक्टरांनी केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 10:06 IST

संबंधित बातम्या