काही दिवसांपासून भारतात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत जाताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी ८ हजाराहून अधिक नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत भारतात ८,३२९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सरकारचा लसीकरणावर भर

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४७,९९५ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५,२४,७७१ वर पोहोचली आहे. याआधी रविवारी ८,५८२ नवीन रुग्ण आढळून आले होते आणि ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी एकूण ८,३२९ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. अत्तापर्यंत १,९५,१९,८१,१५० लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही करोनाचे प्रमाण वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचे २,९४६ नवीन रुग्ण आढळले. यानंतर, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ७९,१०,५७७ वर पोहोचली आहे, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १,४७,८७० वर पोहोचली आहे. मुंबई शहरात करोनाची १,८०३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६,३७० आहे. गोंदिया हा एकमेव जिल्हा आहे जिथे सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही. मुंबईत करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील संसर्गाचे प्रमाण १.८६ टक्के आहे.