ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात, न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने हॅटट्रीकची नोंद केली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २४३ धावांपर्यंत मजल मारली. ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फ यांना माघारी धाडत हॅटट्रीक केली.
२०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकामध्येच हॅटट्रीकची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट अकरावा खेळाडू ठरला आहे.