नवी दिल्ली : सीडीएसएलची उपसंस्था असलेल्या सीडीएसएल व्हेन्चर्स लिमिटेड या संस्थेच्या ४.३९ कोटी गुंतवणूकदारांची माहिती दहा दिवसांत दोन वेळा उघड झाली असून ही माहिती केवायसी  स्वरूपातील आहे. सायबर ९ या नवोद्योग सल्लागार संस्थेने ही माहिती उघड झाल्याचे रविवारी म्हटले आहे. सीडीएसएल ही सेबीकडे नोंदणी असलेली संस्था असून सीडीएसएल व्हेन्चर्स लि. ही केवायसी नोंदणी संस्था आहे. तिची सेबीकडे वेगळी नोंदणी आहे. सीडीएसएलने म्हटले आहे, की माहिती उघड झाल्याचे  कळताच तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून आता माहिती उघड होण्याचे प्रकार होणार नाहीत. सायबर एक्स ९ या नवोद्योगाने म्हटले होते, की १९ ऑक्टोबर रोजी आम्ही सीडीएसएल कंपनीला या  प्रकाराबाबत माहिती दिली होती. सुरक्षा  विभागाने सात दिवसांत उपाययोजना करून  हा प्रकार रोखण्यात यश मिळवले.  २९ ऑक्टोबर रोजी आमच्या चमूने  सीडीएसएलच्या यंत्रणेतील दोषांचे निरीक्षण केले.  सायबर एक्स ९ चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिमांशु पाठक यांनी सांगितले, की सीईआरटी इन व एनसीआयआयपीसी यांनी आम्ही माहिती उघड होत असल्याचा जो प्रकार स्पष्ट केला तो मान्य केला आहे. गुंतवणूकदाराचे नाव, पॅन, इमेल, उत्पन्न, वडिलांचे नाव, जन्मतारीख ही माहिती उघड झाल्याचे सायबर एक्स ९ ब्लॉगमध्ये म्हटले आहे.