Apna Ghar Awaas Yojana 2025 DDA: दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) त्यांची गृहनिर्माण योजना २०२५ नुकतीच जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत दिल्लीकरांना लोकनायकपुरम, सिरसापूर आणि नरेला येथे फ्लॅट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डीडीएच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेअंतर्गत, याची नोंदणी प्रक्रिया २० मे २०२५ पासून सुरू झाली आहे. अपना घर गृहनिर्माण योजना २०२५ अंतर्गत ७५०० फ्लॅट्स विकले जाणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे.

दिल्ली विकास प्राधिकरणाच्या अपना घर गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे तसेच डब्ल्यूएस फ्लॅटसाठी अर्ज करणाऱ्या संयुक्त/सह-अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. याचबरोबर अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

दरम्यान या योजनेची घोषणा २० मे २०२५ रोजी झाली असून, त्याच दिवशी यासाठी नोंदणीही सुरू झाली आहे. यामध्ये २७ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० पासून अर्ज बुकिंगला सुरूवात होणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.

आपण अपना घर गृहनिर्माण योजनेअंतर्गत बुकिंग रक्कम श्रेणीनुसार ठरवण्यात आली आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट ५०,००० रुपये, निम्न उत्तपन्न गटासाठी १,००,००० रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी ४,००,००० रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी १०,००,००० रुपये इतकी रक्कम आकारण्यात येईल.

सिरसापूरमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी ५६४ फ्लॅट बांधले जाणार आहेत, सवलतीनंतर प्रत्येक फ्लॅटची किंमत १३.३ लाख ते १३.६ लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे. लोकनायक पुरममध्ये निम्न उत्पन्न गटासाठी १५० फ्लॅट बांधले जातील, प्रत्येक फ्लॅटची किंमत २०.२४ लाख ते २१.३५ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेलामध्ये, सर्व उत्पन्न गटांसाठी फ्लॅट्स बांधले जाणार आहेत, ज्यांची किंमत प्रत्येकी १० लाख ते १.४७ कोटी रुपये आहे. नरेला येथे डीडीएच्या फ्लॅट्सची मागणी अलीकडेच वाढली आहे. दिल्ली मेट्रोच्या रिठाला-नराला-कुंडली कॉरिडॉरला दिल्ली मंत्रिमंडळाने मान्यता देणे, विविध विद्यापीठांनी कॅम्पस उभारण्याची योजना आखणे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय यासारख्या विकासामुळे नरेला खरेदीदारांची पसंती बनत आहे.