वॉशिंग्टन : चीनच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे अॅप ‘डीपसीक’चे संकेतस्थळाला एक ‘कम्प्युटर कोड’ असून, एखाद्या वापरकर्त्याची ‘लॉग-इन’ची माहिती हे संकेतस्थळ अमेरिकेमध्ये बंदी असलेल्या चीनची सरकारी टेलिकम्युनिकेशन कंपनी ‘चायना मोबाइल’ला पाठवू शकते,’ अशी माहिती अमेरिकेतील सुरक्षा संशोधकांनी दिली. विदा सुरक्षेचा त्यामुळे प्रश्न निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

संशोधकांनी सांगितले, की ‘डीपसीक’च्या ‘लॉग-इन पेज’वर अतिशय क्लिष्ट कम्प्युटर स्क्रिप्ट आहे. तिचा उलगडा झाल्यानंतर चिनी सरकारी टेलिकम्युनिकेशन कंपनी ‘चायना मोबाइल’शी धागेदोरे जुळलेले आढळले. संकेतस्थळावरील कोड वापरकर्त्याच्या ‘लॉग-इन’ प्रक्रियेचा भाग असल्याचे दिसत आहे. नियमांमध्ये ‘डीपसीक’ चीनमधील सर्व्हरवर डेटा साठविण्यात येईल, असे सांगते. मात्र, ‘डीपसीक’चे ‘चॅटबॉट’ चीनच्या सरकारी कंपनीशी निगडित आहे. त्यावर अमेरिकेचे मर्यादित निर्बंध आहे. ‘चायना मोबाइल’ असे या कंपनीचे नाव असून, तिचे संबंध चीनच्या लष्कराशी असल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेने त्यावर निर्बंध घातले आहेत. ‘डीपसीक’च्या ‘लॉग-इन’ प्रक्रियेमध्ये ‘चायना मोबाइल’चा सहभाग आहे, हे उघड असल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया कॅलगरी आणि सर्ज इगलमन विद्यापीठातील सायबर सुरक्षा तज्ज्ञ जोएल रिअरडन यांनी दिली.

Story img Loader