पीटीआय, नवी दिल्ली
नवे वर्ष संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचे वर्ष असेल, असे भारताने बुधवारी जाहीर केले. एकत्रित थिएटर कमांडसह सध्याच्या सशस्त्र दलांचे तंत्रज्ञानाने सुसज्ज अत्याधुनिक लढाऊ सशस्त्र दलांमध्ये रूपांतराचा यात समावेश आहे. यासह संरक्षण साहित्याची खरेदीप्रक्रिया अधिक सोपी केली जाणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२५ हे वर्ष संरक्षण सुधारणांचे असेल, असे ठरविण्यात आले. नव्या वर्षात सायबर आणि अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानाकडेही लक्ष देण्यात येणार आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स या क्षेत्रांकडेही लक्ष दिले जाईल. तिन्ही सुरक्षा दलांमधील समन्वय अधिक वाढण्याकडे याद्वारे लक्ष दिले जाईल. भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी आवश्यक डावपेच, तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यावरही भर दिला जाईल, यावर बैठकीत एकमत झाले.

हेही वाचा : शेतकऱ्यांना दिलासा; खतावरील अनुदान कायम, पंतप्रधान पीक विमा योजनेला बळ

संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले, ‘या सुधारणांमुळे संरक्षण सुसज्जेत खूप आधुनिकता येईल. यामुळे २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाताना भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व हमी जपली जाईल. सुधारणांचे हे वर्ष संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचे पाऊल असेल. हे वर्ष सुधारणांचे वर्ष असेल, असे ठरविण्यात आले.’

देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात

नवी दिल्ली : नवीन वर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरच्या रात्री जोरदार पार्टी आणि १ जानेवारीच्या सकाळी प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गर्दी असे चित्र देशभरात दिसले. पूर्वेच्या भुवनेश्वरपासून पश्चिमेच्या जयपूरपर्यंत आणि दक्षिणेच्या चेन्नईपासून उत्तरेच्या जम्मूपर्यंत सर्वत्र लोकांनी प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन नवीन वर्षाच्या कामाला सुरुवात करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसले. मंदिरांबरोबरच अमृतसरचे सुवर्णमंदिर आणि अजमेरचा दर्गा येथेही भाविकांनी गर्दी केली होती.

‘थिएटर कमांड’ म्हणजे काय?

संरक्षण क्षेत्रातील सुधारणेमध्ये सर्वांचेे लक्ष असेल, ते थिएटर कमांडच्या निर्मितीकडे. या नव्या रचनेनुसार, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या क्षमतांचा एकत्रित वापर केला जाणार असून, युद्धमोहिमेत या तिन्ही दलांची संसाधने एकत्रित वापरता येतील. भौगोलिक क्षेत्रानुसार थिएटर कमांडची निर्मिती केली जाईल. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची युनिट्स त्यामध्ये असतील आणि ते एकत्रितपणे काम करतील. सध्या तिन्ही दले स्वतंत्र असून, त्यांच्या कमांडही स्वतंत्र आहेत.

हेही वाचा : Dawood Ibrahim : उत्तर प्रदेशातल्या माणसाने विकत घेतली डॉन दाऊदच्या नावे असलेली मालमत्ता, ताबा मिळवण्यासाठी २३ वर्षांचा लढा

खरेदीची प्रक्रिया सोपी

संरक्षण क्षेत्रातील सुधारणांमध्ये मुख्य उद्दिष्ट संरक्षण साहित्याची खरेदी अधिक सोपी आणि वेळेचा विचार करून होण्याचे आहे. खरेदी प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांमध्ये अधिक समन्वय होईल, याकडे लक्ष देण्यात येईल. सर्व संसाधनांचा वापर त्यासाठी केला जाईल.

संरक्षण सुधारणांवर भर

● तंत्रज्ञान हस्तांतराला प्राधान्य

● संरक्षण क्षेत्र आणि नागरी उद्याोगांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान

● सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्राधान्य

● संरक्षण साहित्याची निर्यातवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● भारतीय उद्याोग आणि परदेशातील संरक्षण साहित्याची निर्मिती करणाऱ्या उद्याोगांमध्ये संशोधन व विकासामध्ये भागीदारी वाढविणार