दिल्लीमधील अपघातानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असताना आरोपींनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालवणाऱ्या आरोपीने स्कुटीवर स्वार तरुणीला धडक दिल्यानंतर मित्रांना गाडीखाली काहीतरी अडकलं असल्याचं सांगितलं. पण मित्रांनी काहीच नाही आहे असं सांगत गाडी सुरु ठेवण्यास सांगितलं. आरोपींनी तरुणीला तब्बल १३ किमीपर्यंत फरफटत नेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांच्या माहितीनुसार, स्कुटीला धडक दिल्यानंतर तरुणी गाडीखाली आल्याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती असा आरोपींचा दावा आहे. अपघातानंतर आपण पळ काढल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

तब्बल १३ किमीपर्यंत गाडीखाली फरफटत असल्याने तरुणीच्या अंगावरील सर्व कपडेही फाटले होते. रस्त्याच्या मधोमध नग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिची पाठ आणि पाय मोडली होती.

आणखी वाचा – Delhi Woman Accident : “आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते,” दिल्ली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे ‘ते’ ठरले शेवटचे शब्द

आरोपींनी अपघात झाला तेव्हा आपण मद्यधुंद अवस्थेत होतो याची कबुली दिली आहे. कारमध्ये त्यांनी दोनपेक्षा जास्त बाटल्या संपवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सुलतानपुरी परिसरात हा अपघात झाला. तरुणी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कामाला असून घऱी परतत असताना हा अपघात झाला.

आरोपींची ओळख पटली आहे. दीपक खन्ना हा गाडी चालवत होता. तर अमित खन्ना, मनोज मित्तल, कृष्ण, मिथून गाडीत सोबत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही किमी गाडी चालवल्यानंतर दीपकला गाडीखाली काहीतरी अडकलं आहे असं वाटलं. पण जेव्हा त्याने इतर चौघांना विचारलं तेव्हा त्यांनी काही नसून, गाडी चालवत राहा असं सांगितलं.

आणखी वाचा – Delhi Accident : कारखाली फरफटत नेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला?, शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

गाडीत पुढे दीपकच्या शेजारी बसलेल्या मिथूनला यु-टर्न घेतला तरुणीचा हात दिसला. मृतदेह बाहेर पडल्यानंतर मदत करण्याऐवजी आरोपींनी पळ काढला.

यानंतर आरोपींनी भाड्याने घेतलेली कार परत केली. पोलिसांनी कार मालकाकडे चौकशी केली असता त्याने दीपकला गाडी भाड्याने दिली असल्याची माहिती दिली. दरम्यान अपघात झाला तेव्हा अंजलीची मैत्रीण तिच्यासह होती असा खुलासा सीसीटीव्हीतून झाला आहे. अपघातानंतर तिने घटनास्थळावरुन पळ काढला होता. ती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi car accident driver felt something stuck under car but others said no sgy
First published on: 03-01-2023 at 14:30 IST