उत्तर प्रदेशातील मथुरा येथील बांके बिहारी मंदिरात शनिवारी एका ६५ वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. वृंदावनच्या जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ एसके जैन यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी मथुरा येथील रहिवासी लक्ष्मण यांना त्यांच्या नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, जेव्हा ते प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा तेथे मोठी गर्दी होती, त्यामुळे लक्ष्मण यांचा श्वास गुदमरला. त्यांना तात्काळ तेथून बाहेर काढण्यात आले, परंतु मंदिराबाहेर पोहोचत असतानाच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मात्र, सध्या कोणत्याही भाविकाच्या मृत्यूची कोणतीही माहिती नसल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. बांके बिहारी मंदिरात भाविकांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये गर्दीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने योग्य व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकादशीच्या दिवशी मथुरेतूनच नव्हे तर दूर-दूरवरूनही मोठ्या संख्येने लोक बांकेबिहारी मंदिराला भेट देण्यासाठी येतात.