यशस्वी होण्यासाठी धीरुभाई अंबानींची ‘ही’ १० वाक्ये तुम्हाला नक्कीच देतील प्रेरणा

आज अनेक तरुण उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची स्वप्ने पाहत आहेत. या तरुण व्यावसायिकांसाठी दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी आदर्श आहेत.

आज अनेक तरुण उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची स्वप्ने पाहत आहेत. या तरुण व्यावसायिकांसाठी दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी आदर्श आहेत. धीरुभाईंनी शुन्यातून विश्व निर्माण केले आणि रिलायन्स समूहाला यशोशिखरावर नेले. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा उद्योग-व्यवसायामागचा विचार, कल्पना आजही सर्वांनाच प्रेरणा देतात. जाणून घेऊ धीरुभाईंचे व्यवसायाबद्दलचे काही विचार.

– आपली स्वप्न आणि महत्वकांक्षा मोठी असली पाहिजे. पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे, त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत. रिलायन्स आणि भारतासाठी हेच माझे स्वप्न आहे.

– युवकांना चांगले वातावरण द्या, त्यांना प्रेरणा द्या. त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा द्या. प्रत्येकामध्ये अमर्याद ऊर्जा आहे नक्कीच ते काही तरी करुन दाखवतील.

– रिलायन्समध्ये प्रगतीला मर्यादा नाही. मी माझी व्हिजन सतत बदलत असतो. जेव्हा तुम्ही स्वप्न बघता तेव्हाच तुम्ही ते प्रत्यक्षात साकार करु शकता.

– मोठा विचार करा, इतरांपेक्षा आधी वेगवान विचार करा. कल्पनेवर कोणाचीही मक्तेदारी नाही.

– नफा कमावण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही.

–  जेव्हा तुम्ही जिद्द आणि ध्येय डोळयासमोर ठेऊन अचूकतेने काम कराल तेव्हा यश तुमच्या पाठिमागे येईल.

– कठिण काळातही तुमची स्वप्ने साकार करा आणि संकटांना संधीमध्ये बदला.

– माझा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याकाळामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजी नातेसंबंध आणि विश्वास. याच गोष्टी आपल्या प्रगतीचा पाया आहेत.

– दिलेल्या मुदतीत काम करण पुरेसे नाही, मुदतीआधी काम करणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.

– कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका, हिम्मतीवर माझा दृढ विश्वास आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhirubhai ambani reliance group