अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवलं आहे. लैंगिक शोषण आणि मानहानीप्रकरणी ट्रम्प यांना पाच दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे ४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १९९० च्या दशकातील असून एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे.

२०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी आलेला हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण ते २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत होते. यासाठी प्रचारही केला जात होता. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं आहे. १९९० च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोलचं लैंगिक शोषण करणं आणि नंतर तिला ‘खोटं’ ठरवून तिची बदनामी केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मंगळवारी न्यायालयाच्या नऊ सदस्यीय ज्युरीने या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवलं.

ट्रम्प यांच्याविरोधातील या खटल्याची सुनावणी २५ एप्रिलपासून सुरू झाली होती. यादरम्यान, ट्रम्प यांनी पीडितेचे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी सुनावणीदरम्यान पीडितेची अनेकदा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांच्यावर होता.

हेही वाचा- पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटकेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी केवळ एकच गुन्हा केला, तो म्हणजे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७९ वर्षीय कॅरोल यांनी आपल्या जबाबात म्हटलं की, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी १९९५ किंवा १९९६ मध्ये मॅनहॅटनमधील बर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंटल स्टोअरमधील ड्रेसिंग रूममध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून तिची प्रतिष्ठा खराब केली. शिवाय तिचे सर्व दावे फसवे आणि खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं. कॅरोल यांनी २०१९ मध्ये एका पुस्तकात पहिल्यांदाच या घटनेचा उल्लेख केला होता.