Twitter Blue Tick Chargeable: ट्विटरचे मालकी हक्क मिळताच अब्जाधीश एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. ‘ब्लू टिक’ मिळवण्यासंदर्भातील ट्विटरची सध्याची यंत्रणा बकवास असल्याचंही ट्वीट त्यांनी केलं आहे. प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

ट्विटरवर अक्षर मर्यादा वाढणार की, वेगळे काही होणार? मस्क यांनी केले ‘हे’ सूचक ट्विट

ट्विटरच्या या ‘ब्लू टिक’ सेवेचे अनेक फायदे असतील, असे मस्क यांनी म्हटले आहे. ”रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये नव्या धोरणानुसार वापरकर्त्यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय वापरकर्त्यांना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही वापरकर्त्यांची सुटका होईल”, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

Twitter एलॉन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यामध्ये नेमके झाले तरी काय?

ट्विटरसोबत काम करण्यास उत्सुक असलेल्या प्रकाशकांना ‘पेवॉल बायपास’ मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कंपनीकडून अक्षरमर्यादेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटरवर २८० शब्दांची मर्यादा आहे. ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे.

‘ट्विटर’च्या कंटेंट पॉलिसीमध्ये मोठा फेरबदल होणार? एलॉन मस्क यांचं सूचक ट्वीट; म्हणाले, “स्पष्टपणे सांगायचं झालं तर…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे. ट्विटरच्या सात हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.