तामिळनाडूमध्ये जन्मलेले आणि चेन्नईमध्ये वाढलेले गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी माझ्यामध्ये भारताची मुळे खोलवर रुतली आहेत आज मी जे काही आहे त्यामध्ये भारताचा मोठा भाग आहे असे म्हटले आहे. कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमधील गूगल हेडक्वार्टरमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, पिचाई यांनी मोफत आणि मुक्त इंटरनेटच्या धोक्यांसह अनेक विषयांवर भाष्य केले.

‘मी अमेरिकन नागरिक आहे पण माझी मुळे भारतीय आहेत’

४९ वर्षीय पिचाई यांना त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मी एक अमेरिकन नागरिक आहे परंतु माझ्या मनात भारतच आहे. भारतातच माझी मुळे रोवली आहेत. त्यामुळे मी आता जे काही आहे याचा भारत एक मोठा भाग आहे.” कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बोलताना पिचाई म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता मला सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञान म्हणून दिसते आहे, ज्याला मानव विकसित करेल आणि त्यावर काम करेल. जर आपण आग किंवा वीज किंवा इंटरनेटबद्दल विचार करत असाल तर कृत्रिम बुद्धिमत्ताही तशीच आहे.”

फ्री आणि ओपन इंटरनेटवर होत आहे हल्ला

पिचाई यांना सर्व्हेलंसवर आधारित इंटरनेटचे चीनी मॉडेल वाढत आहे का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर पिचाई यांनी फ्री आणि ओपन इंटरनेटवर हल्ला होत असल्याचे म्हटले. थेट चीनचा संदर्भ न घेता ते म्हणाले,”आमची कोणतीही उत्पादने आणि सेवा चीनमध्ये उपलब्ध नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टू फैक्टर ऑथेंटिकेशन वापरा

कराच्या वादग्रस्त विषयावर पिचाई म्हणाले की, “आम्ही जगातील सर्वात मोठे करदात्यांपैकी एक आहोत, जर गेल्या दशकभरातील कराच्या सरासरीकडे पाहिले तर आम्ही २० टक्क्यांहून अधिक कर भरला आहे. पिचाई पुढे म्हणाले,“ आम्ही अमेरिका जिथे आमची उत्पादने विकसित केली जातात तेथे आपला बहुतांश कर भरतो. या व्यतिरिक्त, जेव्हा पिचाईंना त्यांच्या वैयक्तिक तंत्रज्ञानाच्या सवयीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी सर्वांना “टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” वापर करण्याचा सल्ला दिला.