रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात जखमी झाला होता.(युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा). केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती देत हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली, असं सांगितलं होतं. यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही ते म्हणाले होते. दरम्यान, आता जखमी विद्यार्थ्यानाचे त्याची आपबीती सांगितली आहे.

Ukraine War: “त्याला ९७ टक्के गुण मिळायचे पण…”; युक्रेनमध्ये मरण पावलेल्या नवीनच्या वडिलांची शिक्षण पद्धतीवर टीका

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

किव्हमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव हरजोत सिंग आहे. तो मूळचा छत्तरपूरचा आहे. त्याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, “त्याच्या पायाला खूप वेळ मार लागल्यानं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. गोळी माझ्या खांद्यावरून घुसली. डॉक्टरांनी माझ्या छातीतून एक गोळी काढली आहे,” असं हरजोत सिंग किव्ह सिटी हॉस्पिटलमधून बोलताना म्हणाला.

Ukraine War: युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शेअर केला Video

“मी दूतावासातील लोकांशी संपर्क साधला आणि विचारले की ते मला ल्विव्हला नेण्यासाठी सुविधा देऊ शकतात का. मला चालता येत नव्हतं. पण मला फक्त खोटी आश्वासनं मिळाली. मी अधिकार्‍यांना फोन करत राहिलो. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही,” असा आरोप त्याने केलाय.

“एका मृतदेहाऐवजी…”; युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यासंदर्भात BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

माझ्यासारखे असंख्य हरजोत किव्हमध्ये अडकून असल्याचं तो म्हणाला. “बर्‍याच जणांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे, त्यांना काय होत आहे ते कळत नाही. मी सतत दूतावासाशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यापूर्वीच दूतावासातील अधिकारी ल्विव्हला निघून गेलेत. त्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली नाही,” असा आरोप हरजोतने केलाय.

Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

“माझा एकच मेसेज आहे की जे काही घडलंय, त्याबद्दल आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही फक्त चांगल्याची आशा करू शकतो. युक्रेनमधील वास्तव काय आहे, हे लोकांना समजलं पाहिजे,” असं तो म्हणाला. ‘माझी आई घरी सतत रडत आहे,’ असं त्याने सांगितलं.