नवी दिल्ली : सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत असताना संरक्षणमंत्र्यांनी ही मोहीम संपविलेली नाही, तर थांबवली असल्याचे सांगितले. जर मोहीम संपली नसेल, तर ती यशस्वी कशी असा सवाल काँग्रेसचे काँग्रेसचे उप गटनेते गौरव गोगोई यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणात ट्रम्प यांच्या कथित मध्यस्थीचाही उल्लेख करत सरकारला प्रश्न केले.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान, चीन आणि बांगला देश या त्रिकुटांमुळे अडथळे आले. प्रत्यक्षरेषा न ओलांडण्याचा दबाव होता, काही विमाने पडली अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून दिली गेली. मात्र संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणामध्ये चीनचा उल्लेखही केला नसल्याचे सांगत गोगोई यांनी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने कोणासमोर शरणागती पत्करली हे लोकांना कळले पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा २६ वेळा केला आहे.

किती विमाने पडली हे केंद्र सरकार का सांगत नाही? दहशतवाद्याच्या मुद्द्यावर आम्ही केंद्र सरकार बरोबर आहोत. पण, ऑपरेशन सिंदूरमागील पूर्ण सत्य लोकांना कळले पाहिजे. केंद्र सरकार भ्रम पसरवत असेल तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहू, असे प्रहार गोगोई यांनी केला. अनुच्छेद ३७० रद्द केल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाली आहे, कोणतीही भीती न बाळगता पर्यटकांनी तिथे गेले पाहिजे असे शहा सांगत होते. मात्र, पहलगाममध्ये पर्यटक किती असहाय्य होते हे पाहायला मिळाले. शहां पर्यटक कंपन्यांना दोष देऊ शकत नाहीत. केंद्र सरकार कमकुवत आणि घाबरट असल्याचे दिसल्यामुळेच पहलगाममधील हल्ला झाला, असा गंभीर आरोप गोगोई यांनी केला.

उरी, पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानात लक्ष्यभेदी हल्ले, हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तान कुरापत करण्याचे धाडस करणार नाही, असे मोदी सांगत होते. मग, पहलगाममध्ये हल्ला करण्याचे पाकिस्तानचे धाडस झाले कसे? – गौरव गोगोई, लोकसभेतील उप गटनेते, काँग्रेस</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थरूर यांचा सहभागास नकार

केंद्र सरकारच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी परदेशात शिष्टमंडळ घेऊन जाणारे काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी लोकसभेत बोलण्यास नकार दिला. काँग्रेसने थरूर यांच्याकडे चर्चेत सहभागी होण्यासंदर्भात विचारले होते. मात्र, याबाबत काँग्रेसची भूमिका मांडण्यास थरूर यांनी नकार दिला. काँग्रेसकडून वक्त्यांच्या यादीमध्ये मनीष तिवारी, अमर सिंह यांचाही समावेश करण्यात आलेला नाही.