Girish Kuber On Iran VS Israel War and America : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असतानाच आता अमेरिकेनेही या संघर्षात उडी घेतली आहे. २२ जून रोजी अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रावर हल्ला करत ते नष्ट केल्याचा दावा केला आहे.
या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांच्या भूमिका समोर आल्या असून काही देशांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आता इराण ‘होर्मुझ’चा जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इराणच्या या निर्णयाचा भारतासह जगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इस्रायल आणि इराण संघर्ष आणि या संघर्षात अमेरिकेने घेतलेली उडी याचा काय परिणाम होईल? या हल्ल्यामुळे आणखी कोणते परिणाम होतील? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’मध्ये आपले विचार मांडले आहेत.