girl remove pakistani flag from the Road expelled : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशच्या सहारणपूरच्या गंगोह भागात एका विद्यार्थिनीचा सार्वजनिक रस्त्यावर लावलेला पाकिस्तानचा झेंडा काढण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर या विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात वाद आणि आंदोलन झाले होते.

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थीनी ११वीच्या वर्गात शिक्षण घेते आणि बहादूर नगरमधील रहिवासी आहे. ती स्कूटीने तिच्या घरी जात होती जेव्हा तीला रस्त्याच्या मध्ये झेंडा चिकटवलेला दिसून आला. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणाऱ्या एका गटाने तो झेंडा रस्त्यावर लावला होता. हा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक कृती म्हणून झेंडा रस्त्यावर लावण्यात आला होता, जेणेकरून लोकांना पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त करताना झेंडा पायदळी तुडवता येईल.

हा झेंडा पाहून मुलगी थांबली आणि तीने तो काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जवळ उभ्या कोणीतरी याचा १२ सेकंदांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक संघटनांनी याचा निषेध केला आणि त्या विद्यार्थिनीचं वर्तन देश विरोधी असल्याचे म्हटले. याबरोबरच काही जणांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली. शाळा प्रशासनाने वाद वाढू नये म्हणून त्या संबंधित विद्यार्थीनीला शाळेतून काढून टाकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेचे मुख्याध्यापक भूपेंद्र सिंग यांनी विद्यार्थीनीला काढून टाकल्याची पुष्टी केली आणि प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यिनीच्या कुटुंबियांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. चौकशीनंतर विद्यार्थिनीला परत घेतले जाईल की नाही हे शाळेने स्पष्ट केलेले नाही.