गोव्यात आम्ही सर्व पर्यटकांचे स्वागत करतो पण जे पर्यटक गोअन्सचा आणि इथल्या कायद्याचा आदर करणार नाहीत त्यांना आम्ही कुठलीही सवलत देणार नाही असे गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले आहे. गोव्यात दारु पिणे ही समस्या नाही पण दारु पिल्यानंतर पर्यटक जी कृत्ये करतात त्यामुळे समस्या निर्माण होते. आम्हाला फक्त चांगले पर्यटक हवे आहेत असे मनोहर आजगावकर म्हणाले.

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारे आणि कचरा करणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यात येईल अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आधीच केली आहे. महिलांबरोबर गैरवर्तणूक करणाऱ्या पर्यटकांनाही आजगावकर यांनी इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांगल्या पर्यटकांना गोव्याची संस्कृती, निसर्ग सौंदर्य याबद्दल आत्मीयता असते. आमचं गोवा भारत आणि संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. लोक इथे गोव्याची संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य पाहायला येतात. जे दारु पिऊन गैरवर्तन करणारा त्यांच्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असे आजगावकर म्हणाले.