Government bans ULLU ALTBalaji over Adult Content : केंद्र सरकारने अश्लील, विडंबनात्मक व प्रौढांसाठी असलेला कॉन्टेंट प्रसारित करण्याच्या आरोपांवरून अनेक अ‍ॅप्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स व वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये ऑल्टबालाजी, उल्लू, बिग शॉट्स अ‍ॅप, देसीफ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाइट व गुलाब अ‍ॅप मिळून एकूण २५ अ‍ॅप्स व वेबसाइट्सचा समावेश आहे. डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण ठेवणे व अश्लील कॉन्टेंट प्रसारित करणाऱ्यांना वेसण घालणे आणि प्रौढांसाठीच्या कॉन्टेंटचा प्रसार रोखण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात यासंबंधीच्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकार व प्रमुख डिजीटल प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली होती. या याचिकेत ओटीटी व समाजमाध्यमांवरील अश्लील कॉन्टेंट रोखण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह अनेक लोकप्रिय व आंतरराष्ट्रीय ओटीटी कंपन्यांना, तसेच लहान मोठ्या ओटीटी कंपन्या, अ‍ॅप्स व वेबसाइट्सना देखील अशा नोटिसा बजावल्या होत्या. यामध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, उल्लू, ऑल्टबालाजी, एक्स (ट्विटर), फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्यूबचाही समावेश होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सरन्यायाधीश भूषण आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटलंय की ही याचिका गंभीर चिंता व्यक्त करत आहे. मात्र, हा विषय विधीमंडळाच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यामुळेच न्यायालयाने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटलं होतं की हा “आमच्या अधिकारक्षेत्रातील विषय नाही. त्यामुळे तुम्ही यासाठी काहीतरी करा.”