केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान हाईल तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करताच आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ जारी केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी गुजरातच्या जनतेला मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. तसेच गुजरात विधानसभेची निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

हेही वाचा >>> “…तर मी राजीनामा देण्यास तयार,” केरळच्या राज्यपालांचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना खुले आव्हान

गुजरातचा निवडणूक कार्यक्रम घोषित होताच अरविंद केजरीवाल यांनी समाजमाध्यमांवर एका मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते गुजराती भाषेत बोलताना दिसत आहेत. “मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग असून तुमचा भाऊ आहे. मला फक्त एक संधी द्या. मी तुम्हाला मोफत वीज देईन. तसेच तुमच्या मुलासांठी चांगल्या शाळा, रुग्णालये बांधेन. मी तुम्हाला श्रीराम यांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला घेऊन जाईन,” असे आश्वासन अरविंद केजरीवाल या व्हिडीओमध्ये देताना दिसत आहेत.

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाने तीन माकडांची चित्रं लावलीयेत”, निष्पक्षतेवरून काँग्रेसच्या आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर, म्हणाले…

गुजरातमध्ये आप पक्ष ९० ते ९५ जागांवर जिंकणार आहे. आम्हाला मिळत असलेला प्रतिसाद असाच कायम राहिला तर हा आकडा १४० ते १५० पर्यंत जाऊ शकतो, असा दावा आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. आप पक्ष सर्वच्या सर्व म्हणजेच १८२ जागांवर आपला उमेदवार उभा करत आहे. २०१७ च्या निवडणुकीत आपने ३० जागांवर उमेदवार उभे केले होते.

हेही वाचा >>> Gujarat Election 2022 Updates : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार, तर निकाल ८ डिसेंबरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणूक लक्षात घेता मागील काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल गुजरातचा सातत्याने दौरा करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील अनेकवेळा गुजरात दौरा केलेला आहे. आम्ही दिल्लीप्रमाणेच गुजरातचाही विकास करू, असे आश्वासन आप पक्षाकडून दिले जात आहे.