गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक जवळ आल्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पार्टी अर्थात आप पक्ष पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे एमआयएमदेखील येथे जवळपास ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, एमआयएमचे सर्वोसर्वा असदुद्दीन ओवैसी यांना येथे काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या सुरतमधील एका सभेत श्रोत्यांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या आहेत.

हेही वाचा >> राजस्थान : उदयपूरमध्ये रेल्वे रुळावर स्फोट, यूएपीएच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा, तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार ओवैसी गुजरातमधील सुरत येथई रुद्रपुरा भागात एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. मात्र येथे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच ओवैसी यांच्या स्वागतावेळी सभेमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. ओवैसींच्या सभेमध्ये श्रोत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> “प्रियंका गांधी मला भेटायला आल्या, तेव्हा…”; राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरनने सांगितला अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुजरामध्ये ओवैसी यांचा पक्ष साधारण ३० जागा लढवणार आहे. आप पक्षानेदेखील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याच कारणामुळे भाजपाला ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवावी लागत आहे. येथे १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल.