संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला फाशी देताना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करण्यात आले असून, फाशी देण्याचा निर्णय राजकीय नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले. तिहार तुरुंगातील अफजलच्या कबरीवर नमाज पढण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास त्यावर विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. अफजलला फाशी देण्याचा निर्णय आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनेही फेटाळून लावला.
अफजलला फाशी देणार असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी करून ते त्याच्या कुटुंबीयांना ७ फेब्रुवारी रोजी स्पीड पोस्टने पाठविले होते. त्याची पावती आपल्यापाशी आहे. मात्र, ते पत्र त्याच्या कुटुंबीयांपर्यंत अजूनही पोहोचलेले नाही, याकडे लक्ष वेधले असता सारी कामे गृहमंत्री करीत नाही, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना ८ फेब्रुवारीच्या रात्री आपण स्वत: फोन करून अफजलला फाशी देणार असल्याची माहिती दिली होती, असे शिंदे यांनी सांगितले. राजीव गांधी आणि बिअंत सिंग यांच्या हत्येचे आरोपी अतिरेक्यांना फाशी का दिली नाही, असे विचारले असता ही प्रकरणे अजूनपर्यंत न्यायालयात प्रलंबित आहेत. पुढची फाशी कोणाला देणार हे जाहीर केल्यास कोणीही न्यायालयात दाद मागेल. सारे काही पारदर्शीपणाने केल्यास सरकारला काम करणे अवघड होईल, असे शिंदे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
अफजलच्या फाशीचा निर्णय राजकीय नव्हता-शिंदे
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला फाशी देताना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करण्यात आले असून, फाशी देण्याचा निर्णय राजकीय नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.
First published on: 12-02-2013 at 04:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hang to afzal is decision is not for political shinde