पीटीआय, बेंगळुरू

जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी गुरुवारी त्यांचा नातू आणि पक्षाचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णाला ‘कठोर ताकीद’ देत मायदेशी परत येण्यास आणि लैंगिक प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले. गैरवर्तनाचे आरोप, चौकशीत त्याच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असे प्रतिपादन देवेगौडा यांनी केले.

अनेक महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेल्या पक्षाचे हसन खासदार प्रज्वल यांना त्यांनी भारतात परत येऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रज्वल जर्मनीला रवाना झाला होता. देवेगोडा यांनी पुनरुच्चार केला की त्यांचा नातू दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे.

‘या क्षणी, मी फक्त एकच गोष्ट करू शकतो; मी प्रज्वलला कडक इशारा देऊ शकतो. तो जिथे असेल तिथून परत येण्यास सांगू शकतो आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला सांगू शकतो. त्याने स्वत:ला कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन केले पाहिजे,’ असे ९२ वर्षीय देवेगौडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>>मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”

गौडा यांनी स्पष्ट केले की, ‘‘मी करत असलेले अपील नाही, तर मी जारी करत असलेला इशारा आहे. जर त्याने या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही, तर त्याला माझ्या रागाचा आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कायदा त्याच्यावरील आरोपांची चौकशी करेल, परंतु कुटुंबाचे ऐकून न घेतल्याने त्याला पूर्णपणे वेगळे केले जाईल. जर त्याच्याकडे माझ्याबद्दल आदर असेल तर त्याला लगेच परत यावे लागेल,’’ गौडा म्हणाले.

माजी पंतप्रधान म्हणाले, ‘‘मी हे देखील स्पष्ट करू इच्छितो की त्यांच्याविरुद्धच्या तपासात माझा किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचा कोणताही हस्तक्षेप होणार नाही. माझ्या मनात या संदर्भात कोणतीही भावना नाही, फक्त त्याच्या कथित कृती आणि गैरकृत्यांमुळे बळी पडलेल्यांना न्याय मिळण्याचा मुद्दा आहे’’

‘‘प्रज्वलमुळे मला, माझे संपूर्ण कुटुंब, माझे सहकारी, मित्र आणि पक्ष कार्यकर्त्यांना जो धक्का बसला आहे त्यातून सावरण्यासाठी मला थोडा वेळ लागला. प्रज्वलच्या वाचवण्याची माझी इच्छा नाही. तसेच तो परदेशात जाण्याची कल्पनाही नव्हती,’’ देवेगौडा म्हणाले.

हेही वाचा >>>माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना पत्राद्वारे इशारा; म्हणाले, “जिथे कुठे असशील परत ये, अन्यथा…”

केंद्र सहकार्य करण्यास तयार : प्रल्हाद जोशी

खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा राजनैतिक पारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला देशात परत आणण्यासाठी केंद्र सहकार्य करण्यास तयार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले. राज्य सरकारवर हल्लाबोल करत जोशी यांनी विचारले की, प्रज्वल परदेशात पळून जाण्यापूर्वी त्याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही आणि त्याला ताब्यात का घेण्यात आले नाही? काँग्रेस सरकार केंद्रावर दोषारोप करून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पासपोर्ट रद्द करा; सिद्धरामय्या

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र लिहून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी ‘त्वरीत आणि आवश्यक’ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे ‘अत्यंत निराशाजनक’ आहे की त्यांनी इतक्या गंभीर प्रकरणात यापूर्वी लिहिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई केली नाही. सिद्धरामय्या यांनी यापूर्वी १ मे रोजी पंतप्रधानांना पत्र लिहून परराष्ट्र आणि गृह मंत्रालयांना प्रज्वलचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले होते. अलीकडेच, खासदाराविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्रही लिहिले होते.कर्नाटक सरकारच्या विनंतीवरून प्रज्वलचा राजनैतिक पारपत्र रद्द करण्याच्या विनंतीवर परराष्ट्र मंत्रालय कारवाई करत आहे.एफआयआर दाखल होण्याच्या काही तासांपूर्वीच २७ एप्रिलला तो राजनैतिक पासपोर्ट नंबर डी११३५५०० चा वापर करून जर्मनीला पळून गेला होता.