वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आसाममधील तरुणाने हद्दपारीसंबंधात दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मान्य केले. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या आईला हद्दपार करण्यासाठी घेऊन गेले असून तिचा शोध लागत नसल्याची तक्रार युनुस अली या याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युनुस अलीच्या याचिकेवर न्या. संजय कारोल आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आपली आई मोनोवरा बेवा हिला २४ मे रोजी धुब्री पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली झाली असे युनुसने याचिकेत म्हटले आहे. त्याची याचिका बेकायदा स्थलांतरासंबंधीच्या इतर याचिकांबरोबर एकत्र केली जाईल असे सुरुवातीला खंडपीठाने सांगितले. मात्र, या प्रकरणी तातडीने नोटीस बजावण्यात यावी जेणेकरून राज्य सरकारला उत्तर देता येईल अशी विनंती याचिकाकर्त्याचे वकील कपिल सिबल यांनी केली, ती न्यायालयाने मान्य केली.