दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दिल्लीतील NCR भागात दुपारपासूनच ढग जमा झाले होते. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले ज्यामुळे रस्त्यांवर धुळीचे लोट पाहण्यास मिळाले. त्यानंतर काही वेळापूर्वीच जोरदार पावसाने दिल्लीत हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर मुसळधार पावसाने राजधानीत हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Heavy rain and hailstorm hit part of Delhi, visuals from near Kashmere Gate. pic.twitter.com/zfwSJL4eQf

— ANI (@ANI) May 14, 2020

काशमीरे गेट भागात तर वीजा कडाडून पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १३ आणि १४ मे रोजी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाच होता. त्यानुसारच आज दिल्लीत मुसळधार पाऊस पडला. मागच्या रविवारीही वादळी वारे दिल्ली आणि नोएडा परिसरात वाहिले होते. पावसामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिल्लीत पाहण्यास मिळाले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain and hailstorm hit part of delhi scj
First published on: 14-05-2020 at 18:43 IST