पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आता मरियम शरीफ यांनी असं म्हटलं आहे की इम्रान खान हे इतके घाबरले होते की त्यांनी माझ्यावर तुरुंगातही असतानाही नजर ठेवली होती. एवढंच नाही तर बाथरुममध्येही छुपे कॅमेरे बसवले होते. पाकिस्तानचं सरकार हे महिला विरोधी सरकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मरियम शरीफ यांना मागील वर्षी चौधरी शुगर मिल केसमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तुरुंगात असताना तिथेही नजर ठेवण्यात आली आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावले गेले होते असा आरोप आता मरियम यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मरियम शरीफ यांनी हा गंभीर आरोप केला आहे. “मी दोनदा तुरुंगात गेले, या काळात एका महिलेला तुरुंगात मिळालेली वागणूक ही अत्यंत हीन आणि घृणास्पद होती. सरकारला त्यांचे तोंड दाखवण्याचीही लायकी राहिली नाही” असंही त्या म्हणाल्या. “एका पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महिलेला जर घरी येऊन त्यांच्या वडिलांसमोर अटक केली जात असेल तर पाकिस्तानात कोणतीही महिला सुरक्षित नाही. पाकिस्तान असो किंवा जगातला कोणताही देश कुठेही महिला कमकुवत नाहीत हे इम्रान खान सरकारने विसरु नये” असंही मरियम म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hidden cameras were installed my jail cell bathroom by imran government says maryam nawaz sharif scj
First published on: 13-11-2020 at 16:58 IST