पीटीआय, नवी दिल्ली

भाजप महिलांना दुय्यम वागणूक देत आहे. या पक्षाचे वैचारिक पालक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये महिला प्रवेश दिला जात नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.

काँग्रेसचे उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदित राज यांच्या समर्थनार्थ मंगोलपुरी येथे महिलांच्या मतदान सभेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, भाजपने संसदेत महिला आरक्षण विधेयक मोठ्या थाटामाटात मंजूर केले, परंतु ते लागू करण्यासाठी प्रयत्न केले नाही. ते १० वर्षांनंतर लागू हाईल.

नोकरदार महिलांना घरी आल्यानंतर कामाची दुसरी पाळी करावी लागते आणि त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित होतात. भारतात आपण समाजातील प्रत्येक घटकाबद्दल बोलतो, परंतु काम करणाऱ्या महिला घरी करतात त्या कामाचा उल्लेख क्वचितच केला जातो. नोकरदार महिलांना स्वत:कडे दुर्लक्ष करत जेवण बनवा, मुलांना सांभाळा किंवा इतर घरकामे करावी लागतात. त्याचा त्यांना मोबदलाही मिळत नाहीत. जर पुरुष आठ तास काम करत असतील, तर महिला १६ तास काम करतात. हे एक प्रकारचे बिनपगारी आणि मान्यता नसलेले काम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>>मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”

मेट्रोने प्रवास

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार संपण्यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्ली मेट्रोन प्रवास केला आणि जनतेशी संवाद साधला. ‘‘सहप्रवाशांना भेटलो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दिल्लीत मेट्रो बनवण्याचा आमचा उपक्रम सार्वजनिक वाहतुकीसाठी इतका सोयीस्कर ठरला आहे हे पाहून मला आनंद झाला, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सांगितले. मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद साधतानाची छायाचित्रे त्यांनी शेअर केली.