हिमाचल प्रदेश विधानसभा क्षेत्रात खालिस्तानी झेंडे लावल्याच्या घटनेनंतर हिमाचल सरकारने हाय अलर्ट जाहीर केला आहे. हिमाचल पोलिसांनी रविवारी रात्रीपासुनच हिमाचल प्रदेश राज्याची सीमा सिल केली आहे, तसंच येणा-या जाणा-यांची कसुन तपासणी केली जात आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सांगण्यानुसार सीमा भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कुठलीही देशविघातक शक्ती हिमाचल प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू नये याची पुुर्ण काळजी घेतली जात आहे.रविवारी धर्मशाळा विधानसभा भवनाच्या बाहेर खालिस्तानी झेंडे आढळून आले होते. झेंडे आढळून येण्याच्या घटनेनंतर भागात गोंधळाचं वातावरण निर्णाण झालं होतं. घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी त्वरीत ते झेंडे काढून टाकले होते.

या घटनेची चौकशी करण्यासाठी हिमाचल प्रदेश पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. हे तपासणी पथक खालिस्तानी झेंडे लावण्याच्या घटनेची सखोल चौकशी करून तपासणी अहवाल हिमाचल प्रदेश पोलिसांना सादर करेल. हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्याच्या सर्व अंतर्गत सीमा बॅरिकेट्स लावून सिल केल्या आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये प्रवेश करणा-या प्रत्तेकाची सखोल चौकशी करूनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे.यासोबतच बॉम्ब शोधक पथकालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या राज्याभरात ठिकठिकाणी गस्त घालत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या हॉटेल्सवर पोलिसांची नरज असणार आहे.

खालिस्तानी झेंडे लावल्याच्या घटनेवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले की “गेल्या काही दिवसांपासुन हिमाचल प्रदेशात अश्या प्रकारच्या घटनांना जाणिवपुर्वक खतपाणी घातलं जात आहे. पण अश्या विघातक शक्तींना त्यांच्या या कामात यश मिळणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. धर्मशाळा विधानसभेच्या बाहेर खालिस्तानी झेंडे लावण्याचा खोडसाळपणा ज्याने केला आहे त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असुन घटनेची कसुन चौकशी सुरू झाली आहे.लवकरंच अश्याप्रकारचं कृत्य करणा-या व्यक्तीला अटक करण्यात येईल. हिमाचल प्रदेश हे शांतता प्रिय राज्य असुन अश्या प्रकारच्या घटना कधिही सहन केल्या जाणार नाहीत.”