भाजपाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २६ डिसेंबर रोजी एक्स (जुने ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाल्यानंतर सदर पोस्ट त्यांनी डिलीट केली. भगवद्गीतेमधील एका श्लोकाचा त्यांनी आसामी भाषेत अनुवाद केला होता. ज्यात म्हटले होते की, शूद्रांनी ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य यांची सेवा करणे, हे त्यांचे नैसर्गिक कर्तव्य आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपाची मनुवादी विचारधारा वर्णव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे, अशी टीका केल्यानंतर सदर पोस्ट सरमा यांनी डिलीट केली. तसेच नवीन पोस्ट टाकत दिलगिरी व्यक्त केली.

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एक्स साईटवरून सरमा यांच्यावर सदर प्रकरणी टीका केली. ते म्हणाले, घटनात्मक पदावर काम करत असताना ‘प्रत्येक भारतीय नागरिकाशी समान व्यवहार केला जाईल’, अशी शपथ घेतली जाते. मात्र तुमची विचारधारा किती क्रूर आहे, हे यातून दिसून येते. या विचारधारेचा सामना आसाममधील मुस्लीम जनता मागच्या काही वर्षांपासून करत आहे. तसेच हिंदू धर्म स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही ओवेसी म्हणाले.

pune vidhan sabha voter list
मतदारयादीचा भूतकाळातही ‘गोंधळ’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
trouble for Mahayuti and Mahavikas Aghadi Because of the rebels in thane district
बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली
bjp leader jagannath patil
“माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!

सरमा यांच्या पोस्टवर वाद निर्माण झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी पोस्ट डिलीट केल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. गीतेमधील एका श्लोकाचे आसामी भाषेत चुकीचे भाषांतर झाले, अशी सारवासारव त्यांनी केली. दिलगिरी व्यक्त करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “माझी सोशल मीडिया टीम गीतेमधील श्लोक आणि त्याचा अर्थ पोस्ट करत असते. आतापर्यंत मी ६६८ श्लोक पोस्ट केले आहेत. नुकतेच १८ व्या अध्यायातील ४४ व्या श्लोकाचा चुकीचा अनुवाद माझ्या टीमकडून पोस्ट करण्यात आला. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी लगेचच सदर पोस्ट डिलीट केली. आसाम हे जातीविरहीत राज्य आहे. त्यामुळे या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.”

भारतीय कम्युनिस्ट पार्टीनेही (मार्क्सवादी) सरमा यांच्या पोस्टवर टीका केली. सीपीआय (एम) पक्षाच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरून सदर पोस्टचा निषेध करण्यात आला. सरमा यांनी डिलीट केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉटही जोडताना सीपीआय(एम) ने म्हटले, “शुद्रांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करावी, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सांगतात यावरून भाजपाची मनुवादी विचारधारा उघड होते.”

हिमंत बिस्वा सरमा यांच्या सोशल मीडियावर २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सदर पोस्ट अपलोड करण्यात आली होती. त्यासोबत ४८ सेकंदाचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये शुद्रांनी वरच्या वर्णांची सेवा करावी, असे सांगितले गेले होते.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती हिमंता बिस्वा सरमा यांच्या विचारांशी सहमत आहेत का? सरमा यांच्याविरोधात विरोधक काही बोलले तर ते घरी पोलिस पाठवतात. तरी त्यांच्या या खोडसाळ पोस्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.