Elon Musk Daughter: अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा विजय झाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांच्या विजयानंतर एलॉन मस्क यांनी आनंद साजरा केला. मात्र त्यांच्या तृतीयपंथी मुलीला हा विजय रुचलेला नाही. ट्रम्प यांच्या विजयामुळे आता अमेरिकेत माझे भवितव्य दिसत नाही, अशी खंत मस्क यांच्या तृतीयपंथी मुलीने व्यक्त केली आहे. २० वर्षीय व्हिव्हियन जेना विल्सन हिने वडील मस्क यांच्याशी २०२२ साली सर्व संबंध तोडले होते. आपले नाव आणि लिंग बदलण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर बाप-लेकाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता.

व्हिव्हियन जेना विल्सनने थ्रेड्स या सोशल मिडिया साईटवर पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणाली, “मी याबाबत बराच विचार केला. पण काल मी निर्णयापर्यंत पोहोचले. मला आता अमेरिकेत माझे भवितव्य दिसत नाही.” अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल लागल्यानंतर व्हिव्हियनने ही पोस्ट केली आहे. आणखी एका पोस्टमध्ये तिने म्हटले, “त्यांचा (ट्रम्प) कार्यकाळ जरी चार वर्षांचा आहे. या काळात ट्रान्स विरोधी नियम लागू होणार नाहीत. पण या कायद्याच्या विरोधात ज्यांनी मतदान केले, ते तर बदलणार नाहीत.”

Elon Musk Daughter
व्हिव्हियन जेना विल्सनची सोशल मीडिया पोस्ट

कोण आहे व्हिव्हियन जेना विल्सन?

एलॉन मस्क यांची पहिली पत्नी जस्टीन विल्सन यांना सहा मुले आहेत. त्यापैकी व्हिव्हियन हा एक मुलगा होता. जेव्हा व्हिव्हियनने वडिलांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा वडील मस्क यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी मुलाचा लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय स्वीकारला नाही, असे व्हिव्हियनने सांगितले होते.

एलॉन मस्क यांनी काय म्हटले?

आपल्या मुलीच्या दाव्यावर मात्र मस्क यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मस्क यांनी आपल्या मुलीबरोबर बिघडलेल्या संबंधांना उच्चभ्रू विद्यापीठे आणि शाळांमध्ये नव मार्क्सवाद्यांच्या प्रभावाला जबाबदार धरले. एका मुलाखतीत एलॉन मस्क यांन सांगितले की, सँटा मोनिका येथील शाळेत शिक्षण घेत असताना विल्सनवर प्रभाव टाकला गेला. वोक माईंड व्हायरसमुळे माझ्या मुलाचा खुन झाला, अशी टोकाची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क पुढे म्हणाले की, माझे विल्सनबरोबर अनेकदा भांडण झाले आहे. माझ्या पहिल्या मुलाचा नेवाडाच्या मृत्यूपेक्षाही अधिक जखमा विल्सनशी भांडणामुळे मला झाल्या आहेत. ती आता समाजवादी विचारांच्याही पुढे जाऊन पूर्णपणे कम्युनिस्ट बनली आहे आणि कोणताही श्रीमंत व्यक्ती वाईट असतो, असा तिचा समज झाला आहे.