काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भंडाराही आयोजित केला आहे. ज्या अंतर्गत लोकांना अन्नदान केलं जातं आहे. अशात आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रभू रामचंद्रांना साकडं घातलं आहे.

काय म्हटलं आहे प्रमोद कृष्णम यांनी?

“प्रभू रामाचं दर्शन आपण कधीही घेऊ शकतो. त्यासाठी काही प्रयोजन असण्याचं कारण नाही. मात्र आज एक प्रयोजन आहे. प्रियांका गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी आज प्रभू रामाला साकडं घातलं आहे की एक दिवस प्रियांका गांधी या देशाच्या पंतप्रधान व्हाव्यात.” असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे. ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

रॉबर्ट वाड्रांनी आयोजित केला भंडारा

प्रियांका गांधी या काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांनी उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्याशी लग्न केलं आहे. उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच प्रियांका गांधींच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भंडाराही आयोजित केला आहे. प्रियांका गांधी या राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्या बहीण आहेत. राहुल गांधी हे त्यांचे मोठे भाऊ आहेत.

देशाच्या राजकारणात गांधी घराण्याचं महत्त्व वेगळं आहे. कारण पंडित नेहरुंनंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणून असलेली कारकीर्द खूपच यशस्वी ठरली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले. आता प्रियांका गांधी हा याच गांधी घराण्याचा वारसा चालवत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सोशल मीडियावरुनही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.