भारतीय संघ इंग्लंडमध्ये ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. या सामन्याआधी ICC ने विराट कोहलीचा एक फोटो ट्विट केला. या फोटोत विराटला बादशाह सारखे कपडे घातल्याचे दाखवले आहे. या फोटोवरून जगभरातील चाहते ICC वर नाराज झाले असून त्यांनी ICC ला सुनावले आहे.

विराटचा हा फोटो ICC ने ट्विट केला –

त्या फोटोवर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

—-

—-

—-

—-

—-

दरम्यान, मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही असे स्पष्ट केले होते. “भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. या सामन्याआधी आफ्रिकेचे आघाडीचे गोलंदाज लुंगी एंगीडी आणि डेल स्टेन या दोघांना दुखापतीमुळे सामन्यांना मुकावे लागणार आहे. कोणताही संघ कधीही चांगली कामगिरी करू शकतो आणि कोणताही संघ कधीही खराब कामगिरी करू शकतो. आपण या स्पर्धेत काही अनपेक्षित निकाल पहिले आहेत, त्यामुळे आम्ही या स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही”, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले होते.

भारतीय संघाबाबत देखील त्याने आपले मत स्पष्ट केले. “या स्पर्धेसाठी निवडलेला १५ खेळाडूंचा संघ हा अत्यंत समतोल संघ आहे. या खेळाडूंमुळे कर्णधार म्हणून मला अनेक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संघात कधी ३ वेगवान गोलंदाज खेळतील, तर कधी २ मनगटी फिरकीपटू खेळतील; तर कधी १ मनगटी फिरकीपटू, बोटाने चेंडू फिरवणारा १ फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज असे काही समीकरण घेऊन टीम इंडिया मैदानावर उतरू शकेल. भारतीय संघात रवींद्र जाडेजाची महत्वाची भूमिका असेल. तो भारताच्या संघासाठी खूप फायद्याचा खेळाडू आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करू शकतो. या साऱ्या गोष्टी पाहता आम्ही सर्व आघाड्यांवर समतोल असा संघ निवडला आहे”, असेही विराटने सांगितले.