नुकतेच संसदेत घुसखोरी करण्याचे प्रकरण घडले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेबाबत नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्याकडे आता बोलण्यासाठी कोणताही विषय नाही. बेरोजगार आहे म्हणून आता सर्वांनी लोकसभेत येऊन उड्या मारायच्या का? लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचे इतरही पर्याय आहेत. आपले प्रश्न मांडण्यासाठी इतरही विधायक मार्ग आहेत. त्याचा अवलंब न करता थेट लोकसभेत येऊन उड्या मारणे योग्य नाही.” एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले.

हे वाचा >> “… म्हणून तरुणांनी संसदेत घुसखोरी केली”, राहुल गांधी यांनी सांगितले कारण

राहुल गांधी पुन्हा यात्रा काढणार असल्याचे विचारले असता नारायण राणे म्हणाले, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा यात्रा काढली तरी त्यांना काहीही फायदा होणार नाही. याआधी त्यांनी भारतभर यात्रा काढली. मात्र नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकीपैकी तीन राज्यात आम्ही मोठा विजय मिळविला.” आता लोकसभेची निवडणूक येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक मारतील. यावेळी भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

हे ही वाचा >> संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “याच्यापाठी कोण…”

शर्मिला ठाकरेंनी पुरावा द्यावा

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात नारायण राणे हे अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. आता महाराष्ट्र सरकारकडून एसआयटीची स्थापना झालेली आहे, या निर्णयाचे स्वागत राणे यांनी केले. तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आदित्य असे काही करेल, असे वाटत नसल्याचे काल म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की, शर्मिला ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर मी काही बोलणार नाही. एसआयटी त्यांचा तपास करेल. पण जर कुणाला वाटत असेल की, आदित्य ठाकरेने काहीच केलेले नाही. तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत.

अश्वजीत गायकवाड प्रकरणाची एवढा चर्चा का?

सनदी अधिकारी अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजीत गायकवाड यांनी प्रयेसीला मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ मोठे गुन्हे घडले होते. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडला, असा प्रश्न उपस्थिता का केला नाही?

आणखी वाचा >> Photos : विवाहित असल्याचं बिंग फुटलं, सनदी अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नसल्यामुळे त्यांनी या प्रकरणाला हवा दिली आहे. एफआयआर दाखल झाला असेल तर चौकशीअंती अटक होईल, असेही ते म्हणाले.