Delhi Weather Update : भारतीय हवामान विभाग (IMD) ने स्पष्ट केले की दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ५२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद ही सेन्सर किंवा स्थानिक घटकातील त्रुटीमुळे होती. त्यामुळे तापमानाची अचूकता पडताळण्यासाठी डेटा आणि सेन्सर्सची तपासणी केली जात आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दिल्ली आणि एनसीआच्या विविध भागांमध्ये कमाल तापमान ४५.२ अंश सेल्सिअस ते ४९.१ अंश सेल्सिअसपर्यंत होते. तर, मुंगेशपूरमधअये ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे ही सर्वांधिक सेल्सिअस तापमानाची नोंद नोंदवल गेली. परंतु आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेन्सरमधील त्रुटी किंवा विशिष्ट स्थानिक घटकांमुळे ही सर्वाधिक नोंद झाल्याचा दावा हवामान संस्थेने केला आहे. तसंच, येत्या २-३ दिवसांत उष्मतेची लाट कमी होईल, असं संस्थेने सांगितलं. दिल्लीत काल (२९ मे) पाऊस पडल्याने तापमानात घट झाली आहे. पुढील २-३ दिवसांत उष्णतेची लाट कमी होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे.

मुंगेशपूर स्टेशनवर ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक नोंद होती. डॉ.महापात्रा यांनी नमूद केलं की दिल्लीमध्ये २० मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी तापमानात घट नोंदवली गेली. या स्थानकांवर सरासरी तापमान ४५-५० अंश सेल्सिसअच्या श्रेणीत असल्याचं दिसून आलं. रेकॉर्ड केलेल्या तापमानाच्या अचूकता तपासण्याकरता भारतीय हवामान खातं मुंगेशपूरमधील सेन्सर डेटाचे परीक्षण केले जात आहे.

हेही वाचा >> येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले..

दिल्लीत भीषण पाणी टंचाई

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिल्लीत जलसंकटही निर्माण झाले आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १ मे पासून हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडले नसल्याचा आरोपही मंत्र्यांनी केला आणि हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जाईल. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेजारी हरियाणा आणि उत्तर प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या दिल्लीतील गंभीर जलसंकट उभं राहिलं असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

पावसाची चाहूल लागली

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत नैऋत्यू मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं. मात्र, आता एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये दाखळ होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या ७ ते ८ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.