वर्गात मोबाईल आणल्याचा आरोप एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने पाच विद्यार्थिनींना निर्वस्त्र करत त्यांची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच शिक्षिकेने तपासणी करताना मुलींना मारहाण केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

शिक्षिकेने बाथरूममध्ये नेऊन केलं निर्वस्त्र

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंदौरमधील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. यावेळी वर्ग चालू असताना अचानक मोबाईलची बेल वाजली. त्यानंतर वर्गात असलेल्या शिक्षिकेनं मोबाईल कुणी आणला अशी विचारणा केली. मात्र, विद्यार्थिनींनी उत्तर न दिल्याने शिक्षिकेने पाच विद्यार्थिनींना बाथरूममध्ये नेऊन त्यांना कपडे काढण्यास सांगितले. तसेच त्यांची तपासणी केली.

हेही वाचा – MP temple wall collapses: मध्यप्रदेशमध्ये भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू; धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात

पालकांकडून शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार पालकांजवळ सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. तसेच तपासणी करताना शिक्षिकेने विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेनंतर संबंधित शिक्षिकेची बदली करण्यात आल्याची माहिती शाळेच्या प्राचार्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी म्हणाले…

यासंदर्भात बोलताना इंदौरचे जिल्हाधिकारी म्हणाले, विद्यार्थिनींच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित शिक्षिकेवर कारवाई करत त्यांची बदल करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास शिक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय इंदौर पोलीसदेखील तपास करत आहेत.