Uttar Pradesh Crime news : एका ३९ वर्षीय महिलेने तिच्या पतीच्या डोक्यावर विटेने हल्ला करत, त्याला जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमध्ये ही घटना घडली. गायत्री देवी असं या महिलेचं नाव असून सत्यपाल असं मृतक पतीचं नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिला ही शाकाहारी असून तिचा पती सत्यपाल मांसाहारी होता. यावरूनच दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. गुरुवारी दुपारी सत्यपाल कामावरून घरी जेवायला आल्यानंतर त्याने जेवायला नॉनव्हेज का केलं नाही, अशी विचारणा केली. यावरूनच दोघांमध्ये वाद सुरु झाला. यादरम्यान मृतक पतीने आरोपी महिलेला मारहाणही केली.

हेही वाचा – Serial Killer In UP: सीरियल किलरची दहशत; १४ महिन्यात ९ महिलांची एकाच पद्धतीने हत्या

दरम्यान, आरोपी महिलेचा राग अनावर झाल्याने तिने विटेने पतीवर हल्ला केला. यावेळी सत्यपालने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने मारलेल्या विटेमुळे तो जखमी झाला आणि घराच्या दरवाज्याजवळ जाऊन पडला. त्यानंतर महिलेने त्याच्या छातीवर बसून पुन्हा त्यांच्या डोक्यावर विटेने हल्ला केला. इतकचं नाही, तर त्याचा मृत्यू होईपर्यंत ती त्याला मारत होती.

यादरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, तेव्हासुद्धा ही महिला विटेने पतीच्या डोक्यावर मारत होती. तसेच त्याच्या डोक्यातील मांस बाहेर फेकत होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तसेच तिच्या पतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती तिला सातत्याने नॉन व्हेज जेवण बनवण्यासाठी आग्रह करत होता. तसेच जेवण न बनवल्यास मारहाणही करत होता. गुरुवारी त्याने पुन्हा एकदा तिला नॉनव्हेज जेवणासाठी तगादा लागवला. मात्र, बाहेरून मांस विकत आणण्यासाठी पैसे नसल्याने तिने शाकाहारी जेवण बनवले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हेही वाचा – उत्तर प्रदेशात नझूल जमिनीचा वाद काय? या मुद्द्यावर सत्ताधारी आमदारांकडूनच भाजपला विरोध कशासाठी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटेनंतर मृतक सत्यपालच्या नातेवाईकांनीही प्रतिक्रिया दिली. आरोपी महिला ही मागच्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. तिच्या प्रकृती आता सुधारण होत असल्याचे आम्हाला वाटत होतं. दोघांमध्ये जेवणावरून सातत्याने वाद होत होते. मात्र, त्याच्यातील वाद इतक्या टोकाला जाईल, असं वाटलं नव्हतं, असं त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.