INDIA Alliance : देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांच्या दरम्यान ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे असा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षानचे नेते प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीने हा आरोप केला आहे की भाजपा नेतृत्वातील महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करुन इतका प्रचंड विजय मिळवला आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ ला पार पडली. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२४ ला निकाल लागला. ज्यामध्ये महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान या जागा ईव्हीएमचा फेरफार करुन मिळवण्यात आल्या आहेत असा आरोप इंडिया आघाडीने देशात महाविकास आघाडीने राज्यात केला आहे. तसंच या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया आघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी

इंडिया आघाडीची जी बैठक पार पडली त्यात दिल्लीतल्या मतदार याद्यांबाबत अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच दिल्लीत विधानसभा निवडणूक होऊ शकते. या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर भाजपा-महायुतीने ईव्हीएम मध्ये फेरफार करुन हे यश मिळवल्याचा आरोप इंडिया आघाडीने देशात तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केला आहे.