भारत चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हलचाली पुन्हा वाढल्या आहेत. चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपल्या क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतामधील सुरक्षा चौक्यांवर चीन ड्रोन्सच्या सहाय्याने नजर ठेवत असल्याची माहितीही समोर आलीय. चीन मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन भारतीय सीमेमधील घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

कोणत्या प्रदेशावर आहे चीनची नजर
एएनआयला अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्कराकडून दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या परिसराच्या आजूबाजूच्या क्षेत्रांवर नजर ठेवली जात आहे. चीनच्या ड्रोन्सवर भारत बारकाईने नजर ठेऊन आहे. भारताकडून वेगवेगळ्या माध्यमातून चीनच्या या हलचालींवर लक्ष ठेवलं जात आहे.

नक्की वाचा >> ६०० दिवसांपासून परदेश दौरा नाही, फोनवरुनच चर्चा अन् अचानक… चिनी राष्ट्राध्यक्षांना झालाय गंभीर आजार?

Voting today in 88 constituencies across the country
देशभरात ८८ मतदारसंघांत आज मतदान; मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून आवश्यक सुविधा; चोख सुरक्षा व्यवस्था
Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Over 100 whales rescued off Australian coast
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून १०० हून अधिक व्हेलची सुटका

डोन्स विरुद्ध डोन्स
एएनआयच्या वृत्तानुसार भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारताकडूनही मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन या सीमेवरील हलचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे. लवकरच या कामासाठी इस्त्रायल आणि भारतीय बनावटीच्या ड्रोन्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता भारत चीन सीमेवर ड्रोन्सच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सीमेवरील चीनच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपत्कालीन संरक्षण निधी वापरण्यासंदर्भातील मागणी संरक्षण दलांनी केल्याचंही सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> भारताची चिंता वाढवणारी बातमी : अरुणाचलपर्यंत पोहचली चीनची बुलेट ट्रेन; वेग १६० किमी प्रती तास

तिबेटमध्ये बळजबरीने सैन्य भरती…
पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये चीनकडून मोठ्याप्रमाणात मूलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. थंडीमध्ये या ठिकाणी चिनी सैन्याची व्यवस्था करण्यासाठी कापडी तंबूंऐवजी कायम स्वरुपी घरं आणि विटा सिमेंटचा वापर करुन छावण्या उभारण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. उंच भागांमध्ये भारतीय लष्करी जवानांसमोर कमकुवत ठरणाऱ्या चिनी सैन्यांना या सेवांच्या माध्यमातून मनोबल वाढवण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. भारतीय सीमेवर कुरघोड्या करता याव्यात म्हणून तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास चीनने सुरुवात केलीय. तिबेटमधील अनेक तरुणांना बळजबरीने लष्करामध्ये सहभागी केलं जात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष झाल्यास या स्थानिक तरुणांचा वापर युद्धामध्ये करता येईल असा चीनचा विचार आहे.

नक्की वाचा >> “चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही…”; ९/११ हल्ल्याच्या २० व्या स्मृतीदिनी अमेरिकेला चीनचा इशारा

जगभरातून चीनविरोध…
भारत आणि चीनची ३ हजार ४८८ किलोमीटरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असून यावरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातोय. मात्र दुसरीकडे भारताने चीनला एक इंच जमीनीवरही ताबा मिळून देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तालिबानचं समर्थन करणाऱ्या चीनविरोधात जगभरामध्ये वातावरण निर्मिती झाली आहे. क्वाडपासून दक्षिण चीन समुद्र आणि हिंद पॅसिफिक क्षेत्रामध्येही चीनच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक देशांनी आवाज उठवला असून यामुळे चीनचा तिळपापड झालाय.

नक्की पाहा >> Photos: ‘ही’ आहे ताशी ६२० किमी वेगाने धावणारी चीनमधील ‘फ्लोटिंग ट्रेन’; फोटो पाहून व्हाल थक्क

चर्चेतून मार्ग काढण्याला प्राधान्य…
एकीकडे चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू सांगणाऱ्या चीनने दुसरीकडून अशापद्धतीने कुरघोड्या करत सैन्य तैनात केलं आहे. भारतानेही चर्चेतून समस्या सोडवण्याला प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी चीनने खोटी माहिती पसरवू नये असा सल्ला देताना शेजारी असणारे भारत आणि चीन या जागतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असल्याने मतभेद होणं सामन्य गोष्ट असल्याचं म्हटलंय. हा वाद कसा थांबवता येईल आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल यासाठी दोन्ही देशांनी प्राधान्यक्रम देण्याची गरज असल्याचं मिसरी म्हणालेत.