लोकसत्ता प्रतिनिधी, नागपूर

भारताने २००१ ते २०२२ या कालावधीत आगीमुळे तब्बल ३.५९ लाख हेक्टर वृक्ष आच्छादन गमावले आणि इतर सर्व नुकसानीमुळे २.१५ दशलक्ष हेक्टर नुकसान झाले. या २१ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले. कारण, यात तीन हजार हेक्टर वृक्ष आच्छादनाचे नुकसान आगीमुळे झाले, भारतीय वनसर्वेक्षण अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे.

Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

भारतात फेब्रुवारीच्या मध्यात जंगलांना वणवे लागतात, या वणव्यांचा सरासरी कालावधी सुमारे १४ आठवडे असतो. मात्र, २२ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वेळा ‘फायर अ‍ॅलर्ट’ मिळाला. जंगलाच्या आगीत मोठय़ा प्रमाणात हवामान संकटामुळे वाढ होते. जंगलातील आगीची तीव्रता वाढत आहे आणि २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत जागतिक स्तरावर जवळपास दुप्पट वृक्ष आच्छादन जळत आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष आच्छादनाचे नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम कार्बन उत्सर्जनावर होत आहे.

हेही वाचा >>>चंद्राच्या पृष्ठभागावर लाल-निळा रंग कसला? ‘प्रज्ञान’ने टिपलेल्या ‘विक्रम’च्या फोटोत काय आहे खास?

रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील मोठय़ा जंगलांना व्यापणारी उष्णकटिबंधीय जंगले आणि त्यानंतर अ‍ॅमेझॉनसारखे जैवविविधतेची प्रमुख आणि आग्नेय-आशिया आणि भारतातील वर्षांवनांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय जंगलांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष कव्हरचे वाढते नुकसान जास्त कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतातील जंगलात दोन लाख २३ हजार ३३३ वेळा आग लागली. तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान दोन लाख १२ हजार २४९ वेळा आग लागली अशी माहिती या वनसर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.