पीटीआय, नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या निर्यातीमध्ये ६४.४ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या डेटावरून मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया हा भारताचा व्यापारी भागीदार देश आहे. वस्त्रोद्याोग, रसायने आणि कृषी उत्पादने अशा क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताकडून ६४३.७ दशलक्ष डॉलरची आयात केली असे वाणिज्य मंत्रालयाच्या नोंदींमध्ये आढळते.

मात्र, भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत होणारी निर्यात ५.५६ अब्ज डॉलर इतकी झाली, ती ५.२१ टक्क्याने कमी होती असे प्राथमिक आकडेवारीतून दिसते.

हेही वाचा : क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही देशांनी दोन वर्षांपूर्वी – २९ डिसेंबर, २०२२ रोजी – आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ईसीटीए) केला. आता या कराराची व्याप्ती वाढवून तो सर्वंकष आर्थिक सहकार्य करार (सीईसीए) करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटी सुरू आहेत.