करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. लष्करप्रमुख नरवणे यांना करोना व्हायरसच्या फैलावाचा लष्कराच्या कामकाजावर काय परिणाम झाला आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावर त्यांनी “देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत. COVID-19 चा फैलाव रोखण्यासाठी ही पावले आवश्यक होती” असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- Coronavirus: पंतप्रधान मदत निधीला CRPF ने दिले ३३ कोटी ८१ लाख

“आमच्याकडे आपातकालीन योजना तयार आहे. करोना व्हायरसच्या फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असे नरवणे म्हणाले. ज्या गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नव्याने आखणी केली जाईल” असे नरवणे म्हणाले. मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या भारतीयांना इथे ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहेत अशी माहिती नरवणे यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army has code named its anti covid19 operations as operation namaste dmp
First published on: 27-03-2020 at 12:37 IST