सांंगली : आरडीएक्सने रेल्वे स्टेशन उडवून देण्याची फोनवरून धमकी देणारा पाकिस्तानातील कसाब असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून लाहोरच्या कसाबचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगली, मिरज रेल्वे स्टेशनची झाडाझडती घेतली असून आक्षेपार्ह काहीही आढळले नसले तरी या धमकीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून कसाबविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा, जागांची आकडेवारी जाहीर… आता किती शाळांमध्ये होणार प्रवेश?

sangli lok sabha marathi news, bjp sanjaykaka patil sangli marathi news, vishal patil sangli marathi news
सांगलीतील चित्र बदलले, भाजप – अपक्षात चुरस
Hoax bomb threat to railway station
रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी, सांगली, मिरज स्थानकावर पोलीसांची शोध मोहीम
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
army helicopter emergency landing sangli marathi news, army helicopter sangli marathi news
सांगली: मिरजेजवळ शेतात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
gold necklace, eleven tola,
तुळजाभवानी देवीस अकरा तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

हेही वाचा – “राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

सोमवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात ०८५५१८४५६६० या भ्रमणध्वनी क्रमांकावरून फोन आला होता. फोनकर्त्यांने आपण लाहोरमधून रियाज कसाब बोलत असून आपण दहशतवादी असल्याचे सांगितले, तसेच आपणासोबत पाच व्यक्ती असून आरडीएक्स आहे. सर्वजण रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवणार असल्याचे त्या व्यक्तीने फोनवरून सांगितले. या फोनची तत्काळ गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज व अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली रेल्वे स्टेशनची पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक यांच्यामार्फत झाडाझडती घेतली. सोमवारी रात्रभर ही मोहीम सुरू होती. या वेळी रस्त्यावर असलेल्या सर्व वाहनांचीही झडती घेण्यात आली. रात्रभरच्या शोध मोहिमेनंतर ही पोकळ धमकी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, केवळ धमकी म्हणून याकडे न पाहता या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात रियाज कसाब याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रियाजचा शोध मुंबई पोलीसही घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सतीश शिंदे यांनी बुधवारी सांगितली.